||श्री. जगदंबा माता प्रसन्न ||

||सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ||

संस्थानाविषयी

श्री. मुऱ्हादेवी संस्थान हे मुऱ्हा या गावी वसलेले एक अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे.मुऱ्हा हे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील एक छोटेसे खेडे आहे. हे अमरावती शहरापासून ६२ किमी. अंतरावर आहे .मंदिराला आठशे वर्षाचा इतिहास असून पौराणिक वैभव आहे. पुण्याच्या पुरातत्व विभागाचे अभ्यासक प्रा. गुजल यांच्या मूर्ती पाहणीतून देवीची मूर्ती ही तेराव्या शतकातील असल्याची लेखी माहिती संस्थानाला देण्यात आली आहे. हे संस्थान गावाच्या मध्यभागी आहे. मंदिराच्या पूर्व, पश्चिम व उत्तर दिशेला ३ प्रवेशद्वारे आहेत. बाहेर गावाहून येणाऱ्या भक्तगणांना मंदिराच्या पूर्वेकडील प्रवेशद्वारातून प्रवेश करता येतो. जगदंबा देवी व झिंगराजी महाराजांच्या मंदिरासोबत आतील परिसरात: १. विठ्ठल रुक्मिणी मंदिर २. शिव मंदिर तसेच आतील भुयारात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची सुद्धा मूर्ती आहे. मंदिराच्या आतील परिसर सुबक, नेटका, स्वच्छा व सुंदर आहे. संस्थानात जीर्णोद्धाराचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरु आहे ; आता ते पूर्णत्वास जात आहे. ६ जून २०१७ रोजी देवीचा कलाकर्षण विधी वेदशास्त्रसंपन्न ,श्रीकृष्णशास्त्री आर्वीकर गुरुजी, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाला. जगदंबा देवीचा वज्रलेप विधी प्रा. गाजूल यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ. नीलिमा पाटील यांच्या सहकार्याने ७ जून २०१७ ते ९ जून २०१७ दरम्यान संपन्न झाला. प्राणप्रतिष्ठा विधी १५ जून २०१७ रोजी वेदशास्त्रसंपन्न ,श्रीकृष्णशास्त्री आर्वीकर गुरुजी, नागपूर यांच्या हस्ते संपन्न झाला.

श्री. जगदंबा माता

देवीचे मंदिर अतिशय पुरातन आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते कि, या परिसरात असलेल्या मूर नावाच्या दैत्याचा महिलांना खूप त्रास होता. त्याला साखळदंडाने जेरबंद करून देवीने प्राचीन महादेवाच्या मंदिरात असलेल्या विहिरीत त्याला कोंडून ठेवले.
Read More...

श्री संत झिंगराजी महराज

जगदंबा देवी मंदिराच्या परिसरात श्री संत झिंगराजी महराज यांचे सुबक व रेखीव मंदिर आहे. भुयारात श्री संत झिंगराजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीवर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या परिसरात महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत.श्री संत झिंगराजी महाराज हे संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समकालीन होते.
Read more...

माउली आश्रम

जगदंबा देवी मंदिराच्या परिसरात श्री संत झिंगराजी महराज यांचे सुबक व रेखीव मंदिर आहे. भुयारात श्री संत झिंगराजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीवर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या परिसरात महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत.श्री संत झिंगराजी महाराज हे संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समकालीन होते.
Read more...

आख्यायिका-मुऱ्हादेवी

देवीचे मंदिर अतिशय पुरातन आहे. पूर्वी हे मंदिर हेमाडपंथी होते. नंतर त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. अशी आख्यायिका सांगितली जाते कि, या परिसरात असलेल्या मूर नावाच्या दैत्याचा महिलांना खूप त्रास होता. त्याला साखळदंडाने जेरबंद करून देवीने प्राचीन महादेवाच्या मंदिरात असलेल्या विहिरीत त्याला कोंडून ठेवले. ती विहीर व मंदिर अजूनही या परिसरात आहे. दर चैत्र पौर्णिमेला जेव्हा रात्रौ देवीचा गाड्पगाळचा उत्सव होतो तेव्हा हा दैत्य मोठमोठ्या उसळ्या मारतो, असे अजूनही लोक सांगतात. पूर्वी हा संपूर्ण परिसर अरण्यमय होता, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या भक्तांना आदिशक्तीच्या दर्शनाकरिता माहूरला जावे लागे. त्या भक्तांच्या सोयीसाठी माहूरच्या रेणुकेने रूप अवतीर्ण केले. माहूर->मैहयुर-> मुरहा->मुऱ्हा असा अपभ्रंश सांगितला आहे. अजूनही सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले आदिवासी या देवीला मुराई असेच संबोधितात. या ठिकाणच्या मूर्तीचे वैशिष्ट्य असे कि, मूर्ती पूर्णाकृती आहे. या ठिकाणच्या मूर्तीवर काही ठिकाणी तलवारीचे घाव आहेत. याचा अर्थ मुघल काळात सुद्धा हि मूर्ती होतीच. तसेच या ठिकाणाचे एकमेव वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा सकाळी देवीचे आंघोळ केली जाते. तेव्हा मंदिर पूर्णपाने बंद केले जाते.स्त्रीयांशिवाय कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. हि परंपरा आजतागायत पाळली जाते. देवीसंबंधात माहिती देणारे स्तोत्र,सी. डी. , फोटो उपलब्ध आहेत. श्री संत वासुदेवजी महाराज यांनी लिहिलेल्या स्तोत्रामध्ये सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. शिवाजी महाराजांचे दैवत- आई जगदंबा प्रत्येक मोहिमेला जाण्यापूर्वी शिवाजी महाराज आपले कुलदैवत आई जगदंबेचे स्मरण करून शिवनेरीच्या मंदिरात पूजन करीत असत. मुर्हादेवी येथील जगदंबा मातेचे स्तोत्र लिहिणाऱ्या स्व. वासुदेव महाराजांनी नमूद केल्यानुसार येथे शिवाजी महाराज आपले सरदार प्रतापराव गुजर यांचेसह दर्शनास आले होते. ऐतिहासिक नोंदीनुसार इ.स.१६७० च्या डिसेंबर महिन्यात प्रतापराव अचलपूर मार्गे कारंजा लाडाची लुट करण्यासाठी कित्येक दिवस परिसरात होते, अशी शक्यता वर्तविण्यात येते.

श्री संत झिंगराजी महाराज

जगदंबा देवी मंदिराच्या परिसरात श्री संत झिंगराजी महराज यांचे सुबक व रेखीव मंदिर आहे. भुयारात श्री संत झिंगराजी महाराजांची समाधी आहे. त्या समाधीवर विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर आहे. या परिसरात महाराजांचे भक्तगण मोठ्या प्रमाणात आहेत.श्री संत झिंगराजी महाराज हे संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे समकालीन होते. मुऱ्हा येथीलच पांडे कुळात त्यांचा जन्म झाला. बालपणापासूनच त्यांच्या चमत्कारिक लीलांनी लोकांना त्यांच्यातील अलौकिकत्वाचा प्रत्यय आला. त्या काळी अचलपूरचे स्वामी तपमाळी यांनी लिहिलेल्या महाराजांच्या चरित्र ग्रंथामध्ये सविस्तर चरित्र लिहिलेले आहे. संस्थानतर्फे या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन श्री वासुदेव महाराजांचे हस्ते करण्यात आले आहे. दासगणू विरचित श्री गजानन विजय या ग्रंथात सुद्धा श्री संत झिंगराजी महाराजांचा उल्लेख आहे. संत गजानन महाराज, भाष्कर महराज व संत झिंगराजी महाराज अनेक कार्यक्रमासाठी मुऱ्हा देवीच्या मंदिरात एकत्र आल्याचे उल्लेख आहेत. दर पौष शुद्ध नवमीला महाराजांची यात्रा भरते . आठवडाभर धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल असते. श्री संत झिंगराजी महाराजांच्या भक्तांनी म्हैसपुर जि. अमरावती व शिरसोली जि. अकोला या ठिकाणी सुद्धा मंदिरे बांधली आहेत.

संस्थानात साजरे केले जाणारे उत्सव

 • नवरात्रौत्सव : घटस्थापना , अष्टमी, नवमी-महाप्रसाद , देवीचे स्नान- सकाळी ५ वा, नवरात्रौत्सवातील महाआरती दररोज सायं. ८ वा.
 • पौष शुद्ध नवमी
 • दशमी यात्रा, श्री संत झिंगराजी महाराज पुण्यतिथी महोत्सव या निमित्ताने भजन, कीर्तन, प्रवचन, भागवत आदि कार्याक्रमचे आयोजन
 • चैत्र नवरात्रोत्सव: गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमा
 • चैत्र पौर्णिमा- देवीची यात्रा व रात्रौ गाडपगाळा चा परंपरागत कार्यक्रम.
 • श्रावण मास उत्सव
 • गोकुळाष्टमी उत्सव
 • राम नवमी उत्सव
 • दर एकादशीला श्री संत झिंगराजी महराजांची पालखी गावात प्रदक्षिणा.
 • श्री झिंगराजी महाराजांची पालखी दरवर्षी राष्ट्रसंताच्या पुण्यतिथी महोत्सवात सहभागी.
 • दैनंदिन कार्यक्रम: रोज सकाळी काकडा, सायंकाळी ८ वा. हरिपाठ, आरती व सामुदायिक प्रार्थना.

क्षणचित्रे

संपर्क

देणगी

संस्थानतर्फे देणगी फक्त संस्थानाच्या देणगी कक्षातच स्वीकारली जाते. संस्थानतर्फे कोणतीही व्यक्ती बाहेरगावी देणगी / वर्गणीसाठी नियुक्त केलेली नाही. ज्या भक्तांना online वर्गणी द्यायची आहे, ते खाली दिलेल्या खात्यावर सुद्द्धा देणगी देऊ शकतात. स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा अंजनगाव सुर्जी, जगदंबा देवी व झिंगराजी महाराज संस्थान, मुऱ्हादेवी account no:31040716130 IFSC code SBIN0002138 Branch code-2138

विश्वस्त मंडळ

# विश्वस्त संपर्क
1 श्री. साहेबराव केशवराव पखाण अध्यक्ष ९९६०९१९१४५
2 श्री. चंद्रशेखर त्र्यंबकराव घोगरे उपाध्यक्ष ९४२२२३४५९४
3 श्री. रमेश किसनराव पांडे सचिव ९९७५२२६८७७
4 श्री. गोवर्धन हरिभाऊ बोंदरे कोषाध्यक्ष ९५५२२९६०७०
5 श्री. रमेश किसनराव पांडे सचिव ९९७५२२६८७७
6 श्री. रुपराव बळिरामजी पांडे (विश्वस्त) ९५५२२६९१०८
7 श्री. प्रकाश महादेवराव घोगरे (विश्वस्त) ९३७१७१३१९८
8 श्री. पुरुषोत्तम रामराव मानकर (विश्वस्त) ९२७०२०३४३३
9 श्री. हिम्मतराव गुलाबराव पखाण (विश्वस्त) ९४०३३१२४२०
10 श्री. शालीकराम आत्माराम चौरागडे (विश्वस्त) ०७२२४-२४६१९९
11 श्री. चंद्रशेखर शिवचरण बोंदरे (विश्वस्त) ७८७५८३८४२७
12 श्री. संजय मधुसूदन कोरपे (विश्वस्त) ७५०७००६०३१